top of page

ती पहिली भेट

Mar 24, 2023
2 min read

Updated: Sep 16, 2025

By Aditi Ranmale


मनाची तैयारी करून, त्याला घरी बोलावले होते,

आई-बाबा मला तुम्हाला त्याची ओळख करुन द्यायची होती,

हे शब्द कानावर पडताच जनु त्याना पुढचे चित्र दिसले होते.


त्याला आत बोलावण्याचा आधी,

आई-बाबांचा हात हातात घेऊन प्रेमाने त्याचा कडे पाहिल,

जनु मनातून एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करीत होते,

प्लीज त्याला आपल मानुन घ्या.


तोच हा आहे ज्याचा मुळे मी आतुन हासले,

जुन्या स्वतःला सोडून एक नवीन अस्तित्व स्वीकृत केले होते,

अन याचाच हात पकडुनी परत स्वतः वर विश्वास ठेवला होता.


काही दिवसा पासून आईला माझ वर्तन थोड वेगळ वाटतच होत,

आणी बाबा ही थोडा विचार करीतच होते,

आज आखीर तो दिवस आला होता ज्या दिवशी मी यांची भेट घालून देणारच होते.


मनात थोडीशी लगबग चालुच होती,

आई-बाबांना आवडेल का नाही ही एकच बात मनात फिरत होती,

आजून काही दिवस थांबले असते तर बर झाल असत का?


त्या गोंधळाला थोडस बाजुला ठेवुन स्वतःवर विश्वास ठेवला,

आई-बाबांकडे पाहून एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न केला,

तो थोडा वेगळा आहे पर माझाच आहे.


पहिल्यांदाच एवढा विश्वास मी कुणावर तरी ठेवला आहे,

हे पाहूनी तेही त्याला भेटायला तैयार झाले,

आणी मग मी त्याला आत बोलवलं.


त्याच्या चेहर्‍यावरही थोडीशी भीती होती,

पर तो आई-बाबांना खुश करायचे हेच ठरवूनी आला होता,

माझ्याकडे पाहुनी त्याने गोड स्माईल दिली,

अन त्याला पाहुनी माझ मन शांत झाले.


त्याला बसायला सांगीतले,

थोडी शांतता होती कुणाला कळत नव्हते काय बोलावे,

म्हनुन त्याने म्हंटल “बाबा घर मस्त आहे.”


नक्की मला कळाल नाही काय घडले पर बाबां त्याच्यात एक आपुलकी वाटली,

स्मितहास्य देऊनी बाबाही बोलले “थॅन्क्स बाळा”,

मीही गालातल्या गालात हासले.


आईही त्याचाशी बोलायला लागली,

इतर गोष्टी बोलून झाल,

आणी बाबांनी अचानक विचारले “खरोखर प्रेम करतोस माझ्या मुलीवर?”


हा प्रश्न ऐकून हाही थोडा हासला आणी म्हंटला “प्रेम कोणीही करु शकत पर मी हिला माझ सर्वस्व मानतो.”

हे ऐकून आईही बाबांकडे पाहून थोडीशी हासली,

जनु तिला तिच्या वेळीची आठवण झाली.


हे ऐकूनी बाबाही खुश झाले,

माझ्याकडे पाहूनी बोलले,

“आतापर्यंत मला दोनच मुली होत्या पर आता एक मुलगाही आहे.”


आईने खुश होऊन आमच तोंड गोड केले,

आम्हाला खुशी अनावर झाली अन उठुन एकमेकांना मिठी मारली,

हे पाहूनी आई-बाबा थोडे आश्चर्य झाले,

अन हे झाल्या झाल्या आम्हाला ही ते लगेच लक्षात आले.


एक मिनीट म्हणून हा बाहेर गेला आणी चार गुलाब आणले,

एक आईला एक बाबांना आणी एक मला दिले,

हे एक माझ्या छोटीसाठी आहे हे ही सांगीतल.


‘किती गोड’ असा विचार माझ्या डोक्यात आला,

आणी आईच्या द्वारे बाहेर पडला,

बाबाही इम्प्रेस झाले.


हसत-हसत बाबा म्हंटले,

“तुम्हाला माहिती होते का; आम्ही हो म्हणू ते?”

हा माझा हात पकडून हसत बोला,

“नाही पर आम्हाला आमच्या प्रेमावर विश्वास आहे.”


मनाची तैयारी करून, त्याला घरी बोलावले होते,

आई-बाबा मला तुम्हाला त्याची ओळख करुन द्यायची होती,

हेशब्दकानावरपडताचजनुत्यानापुढचेचित्रदिसलेहोते.


By Aditi Ranmale




Recent Posts

See All
Mirrored Truth

By Rufaida Manzoor I stood beside the silent lake, With eyes that felt no urge to break. My hair fell low in shadows deep, The waters...

 
 
 
My Antidote

By Anveeksha Reddy You fill my books with your ink, seeping into the pages bright and brilliant The words etched into the cracks of it,...

 
 
 
Avarice

By Anveeksha Reddy You tear my skin and pick on my bones I label it as gluttony for you Churning and shattering the remains of my...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page