जनतेचा प्रिय राजा
By Ramendra R. Padelkar
शिव छत्रपती महाराजा
वैऱ्याना देई सजा
समाधानी सारी प्रजा
लखलखीत शिव तेजा
प्रखर हिंदवी ओजा
रयतेच्या वाचवी ईजा
कर्तृत्वाच्या कडाडती विजा
आराध्य भवानी तुळजा
दुष्मणाना लोळवी धुळजा
तन मन नेहमीच ताजा
फुटिरांचा वाजवी बाजा
मार्गदर्शक माता जिजा
शिवबा न होणे दुजा
दशदिशांत गाजा वाजा
न्यायनिष्ठेचामुकुटसाजा
By Ramendra R. Padelkar

Comments