जंगल सफारी.
- Hashtag Kalakar
- Dec 15
- 7 min read
By Arham Sushma Sudarshan Bandekar
रोजचं काम, ह्या शहरातून त्या शहरात खाजगी बैठक वगैरे चा कधी-कधी हेवा वाटतो. पैसा कामवायला तेवढे कष्ट तर घ्यावेच लागत आहेत. हेवा का वाटतो, कारण रोज-रोज तिच-तिच गोष्टं करायची. कंटाळ, थकवा याचाच भाग होऊन जातो. कसं ही असलं तरी जीवन आहे. कसं चालवायचं हे ही माझ्याच हातात आहे. का आपल्याला रोजचा दिवस अगदी रटाळ झाल्यासारखा वाटतो? मग अगदी पार्टी ला गेलो तरी दिवसाच्या शेवटी आपण बोलून जातो, “आज खूप दमलो!”. ‘अरे यार!’ चा उद्गार थकवा आल्यावर देण्यापेक्षा, “अरे यार, मी जीवनाला का दोष देत आहे, मला तर कायम उत्साही राहायचे आहे!”, असा उद्गार प्रत्येकाकडून आलाच पाहिजे. चित्रपट सर्वांनाच आवडतो. तसच आहे जीवन. जसे चित्रपटातील कलाकार मीठ-मसाला लावल्यासारखा चित्रपटाला उत्साही बनवतात, तसा जीवनाला मीठ-मसाला नाही लावायचा आहे, पण आपल्या उत्साहानेच ते उत्साही बनवू शकतो ना? कोणाशी बोलायचे नसेल, नका बोलू, पण निदान जारासे स्मित हास्य तरी ठेवा चेहर्यावर.
परत येतो माझ्या उत्साही जीवनाच्या रुळावर. रोज शहरामधून फिरण होत. शहर म्हणजे जणू कॉन्क्रीटचे जंगलेच झाले आहे. इथली हवा प्रदूषित आहे, प्राण्यांची संख्या घटत आहे. माणसासारख्या सामाजिक प्राण्याची वाढ होत आहे. मलाच आश्चर्य वाटतं की मी रोज वेगवेगळे पद्धार्थ जेवतो मग वातावरण वेगवेगळे का नाही अनुभवत? मग थोडा विचार केला की वातावरण ही थोडं बादलायला हवं, म्हणून रोजच्या दगदगीला थोडा विराम दिला.
‘जायचं कुठे?’या विचारात दिवस घालवायचे नव्हते म्हणून विचार केला की एक अशी जागा जी कॉन्क्रीटच्या जंगलाच्या विरुद्ध असेल. रोज उत्साही राहायचे झाले तरीही कधीतरी हाच उत्साह हजार पटीने वाढवायला नको?
शेवटी निसर्गानेच मार्ग सूचवला. निसर्ग शहरांसारखा नाही आहे. निसर्गाने माणसांना फार सोपवलं, पण अति लोभात येऊन माणसाने निसर्गाचे स्वरूप बद्दलले आहे. माझा मार्ग होता तो म्हणजे जंगलातील वातावरणाचा अनुभव. हे जंगल निसर्ग नसून अनेक जीवांचे घर आहे. इथली हवा शुद्ध आहे. मला तर वाटतं...... माणसे इथे राहिली तर शंभरी पार करतील! मी काही माणसाच्या तंत्रज्ञानवर टीका नाही करत, पण नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाण्याची दुसरी बाजू म्हणजेच निसर्गाचा खातमा करताच अनेक प्राणी-पक्षी बेघर होतात. माणसासारखेच जीव आहेत. मग त्यांच्यासाठी कोण न्यायनिवडा करणार? जर खरच प्राण्यांवर प्रेम करणारी माणसे अस्तित्वात असतील तर ह्या सगळ्याचा बेरोजगार व्हावा. मला फक्त या जंगलाचा निसर्ग अनुभवायचा होता. इथल्या पशुपक्ष्यांच्या जीवनात मला काही व्यत्यय आणायचा न्हवता, पण त्यांची राहणीमानीचे निरीक्षण करायचे होते. चला तर मग ....... लागा घाई ला.
मला इथल्याच जवळच्या मुंबईच्या जंगलात सफारीस जायचे होते. फक्त एका दिवसाची सुट्टी घेतली होती, म्हणून मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची निवड केली. मुंबईतल्या सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी हे एक आहे. हे एकशे तीन किलोमीटर चौरस अंतराने जे, ‘ठाणे-बोरीवली’ – पूर्व-पश्चिम हून व ‘गोरेगाव-दहिसर’ – उत्तर-दक्षिण हून पसरले आहे. मी बोरीवली रेल्वेस्थानकावर उतरलो व टॅक्सी हून
जवळपास सात किलोमीटरच्या अंतराने मुख्यद्वारापर्यंत पोहचलो.
द्वारातून प्रवेश केला, ज्याच्या नंतर जे रम्या मी काही अनुभवलं, ते मुंबईच्या कोणत्याच रेल्वेस्थानकावर नसावं असं होत. उत्साह पूर्णतः उजळून गेला होता. ती शांतता, थंड वातावरण, निसर्गाची महफिल मनाला बेतली. कॉन्क्रीटच्या जंगलात ह्या सर्व गोष्टी दुर्मिळ असाव्यात. तिकीट काढली. मी माझ्या बॅग मध्ये पुरेसा खाऊ घेतला होता. निसर्गात फिरायचे होते, तर तेवढीच ताकद ही असावी लागते. पण माकडे नुसती गोंधळ घालत फिरत होती.
जरा पुढे गेल्यावर एक सुंदर बाग-काम केले होते. ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ हे नाव गवतात कोरले होते व त्यावर एका वाघाचा पुतळा बसवला होता. ही एक निसर्गात सामावलेली कला होती.
काही निसर्गप्रेमी जंगलात बिनधास्त पणे वावरतात. काही जन सायकलद्वारे सायक्लिंग करतात. हे काही पर्याय झाल्यावर एक पर्याय शिल्लक राहतो, तो म्हणजे ‘वनराणी’. वनराणी ही एकप्रकारे मिनी-ट्रेन आहे; जशी माथेरान ला असते तशीच. ही पूर्णतः मोकळी आहे, हिला खिडक्या, दरवाजे बंद करा, उघडा वगैरेचा व्याप नाही. हिचा रंग संपूर्ण पिवळा आहे. टाटा कंपनीद्वारे हिचे उत्पादन करण्यात आले होते. हिला जवळ-जवळ तीन-चार भोगी आहेत. आणखी हिच्या दोन्ही बाजूस विविध पशुपक्ष्यांची चित्रे रंगवली आहेत. हिच्या पृष्ठ भागावर पाटी लावली आहे, ज्यावर मध्ये वाघाचे मुख चित्रित करून, डाव्या बाजूला वन आणि उजव्या बाजूला राणी असे लिहिले आहे. २०२१ साली च्या तौक्ते चक्रीवादळचा फटका बसल्यामुळे तात्पुरती हिची सेवा बंद करण्यात आली होती. सफारीला बस ही उपलब्ध आहेत.
वनराणीतून प्रवास करताना मला अनेक दुर्मिळ क्षणांचा अनुभव घ्यावयास मिळाला. अनेक धबधबे, हरणांची बाग, रंगीबेरंगी फुले, त्यांची हिरवी झाडे इत्यादींचा आस्वाद मनाने घेतला. मुंबईच्या लोकल ट्रेनचा व ह्या मिनिट्रेनच्याप्रवासमधला फरक जाणवला. मुंबई लोकल चे स्थानक! ....... काही-कधी वाटते ह्या लोकल ने प्रवासास करूच नये. गर्दी तर असतेच अधिक कचराकुंडी असून ही कचरा पसरलेला असतो, तोंडी मारलेल्या पिचकार्यांचे नक्षी! ...... समजून जा. प्रदूषणाच्या हवेत धावणारी जिच्याही रूळांवर प्लॅस्टिक चा भंडारा असतो. अपघातांचे वेगळेच दृश्य असते! नुसती घाई-घाई, ढकलाढकली, नीच शब्द, फुकटचा गोंधळ. लोकल, जी ‘मुंबई उपनगरी रेल्वे’ आहे, मुंबई ची ‘लाइफ-लाइन’ आहे; याच मुंबईच्या लाइफ-लाइन चे वातावरण विविध विचारांनी भरले आहे. पण इथे एकदा येऊन पहा. किती विरुद्ध दृश्य आहे! सुखाची डाळ शिजल्यासारखी वाटते. इथे फक्त निसर्गाचा भंडारा! जो उत्साह लोकल ट्रेन मध्ये अनुभवला जात नाही, तो इथे अनुभवलं जातो. इथे उत्साहाशिवाय कोणताच विचार मनास लाभत नाही.
इथे बघितलं, तर पालापाचोळा जाळला जातोय. पण याचा कोणत्याच प्राणीमात्र्याला त्रास नाही. ती बाहेर पडत होती ती ‘जैविक ऊर्जा’. सुकलेली झाडांची पाने, दगड, खडक यांचे मिश्रण असलेले पाणी मातीतून सळसळत वाहत होते. मुंबईच्या गल्लीत बघा, कोणी थरमाकॉलचे पुट्टे जाळतय, प्लॅस्टिक च्या गोष्टी जाळताय. रसायनमिश्रित पाणी नद्यांना, तलावांना भेट देताय. अशी आहे आपल्या ‘मुंबईची केमिस्ट्री’!
सामाजिक प्राणी म्हणून माणसाने जगात अपार प्रगति केली आहे. विज्ञानाचा यात फार मोलाचा वाटा आहे. विज्ञानाशिवाय माणूस जगूच शकत नाही, एवढी त्याची प्रचंड ओढ लागली आहे. पण अल्पकाळातच याच माणसाने विज्ञानाचा विश्वासघात केला असल्याचे समोर येत आहे. माणूस निसर्गापेक्षा मोठा नाही. पण इथे तर पहा, माणूस निसर्गाचा ‘बाप’ बनून बसलाय. जर माणूस विज्ञानाचे नियम पळत आहे, तर विज्ञानामध्ये ‘सहजीवन’ नावाचे वचन निसर्गात फार महत्त्वाचे आहे. सहजीवन म्हणजे दोन जीवांमधला सहयोग. मग तो जिवंतच का असेना, तो निसर्गाचा घटक आहे ना, हे महत्त्वाचं. ‘दगडफूल आणि शेवाळ’ इतके छोटे जीव! शेवाळ दगडफूलास अन्नाचा पुरवठा करून देत व दगडफुल त्यास ओलसर राखते. असे वाटते माणसाला अजून खूप शिकण्याची गरज आहे.
रोजच्या जीवनातील उदाहरण घेऊन सांगतो – ‘प्रॉपर्टी वरचे वाद’. हा विषय सध्या तरुणाईमध्ये जास्त ताणला गेला आहे. निम्म्यहून अधिक हत्या ह्या वरूण तर होतात. मान्य आहे, प्रत्येक माणसाला जगात त्याचे स्वतंत्र महत्त्वाचे स्थान हवे असते. पण हे ही तितकेच आहे की आदिमानवणे ह्या जगाला वळण द्यायला पुष्कळ कष्ट घेतले आहेत. म्हणून ह्याच जगाला आताच्या प्रत्येक मनुष्याकडून कष्टाची अपेक्षा आहे. नुस्तं आयतं येऊन जेवायला बसण्याचे प्रकार नको. हेच होतय रोजच्या राहणीमानीत. आपल्याला असा व्यापार नको आहे जो पुढे जाऊन आपल्यालाच बेरोजगार ठरवेल. साधणे उपलब्ध आहेत. पुरेपूर व मर्यादित वापर करून कितीतरी विचारपूर्वक संशोधणे होतील!
वनराणी ने दोन स्थांनाकांचे अंतर पार केले – कृष्णगिरी व तीनमूर्ती. गाडीचा वेग धीमी असला, तरी बाहेर भ्रमणध्वनी काढून गाणी ऐकण्याची, व्हिडिओ बघायची, इ. ची वेळ आलीच नाही; थोडक्यात भ्रमणध्वनीला हात लावण्याची वेळ आलीच नाही. रोजच्या मुंबईच्या चार भिंतीत मनोरंजनाचे साधन म्हणून दूरदर्शन, भ्रमणध्वनी, लॅपटॉप, इ. चालूच असतात पण ह्या दुर्मिळ झालेल्या निसर्गाने यांच्यावर एक सकारात्मक जादू केली होती.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक राखीव अभयरण्य असल्याने इतले प्राणी पक्षी कितीतरी मैल फिरू/वावरू शकतात. इथे यांना तुरुंगात किंवा मर्यादित जागेत ठेवले जात नाही. त्यामुळे मनात सारखी भीती होती की कोणत्या मांसाहारी प्राण्याने झडप घातली तर.....! पण कशाला हा नकारात्मक विचार? जर मी माझ्या मनाने इथे एक वेगळे वातावरण म्हणून फिरायला आलो आहे, तर मला ह्या संपूर्ण निसर्गाचा प्रत्यय घ्यावयास नको का? जर निसर्गावर खरं प्रेम असेल ना, तर ह्या गोष्टी मनात असल्याच नाही पाहिजेत. आणि तसं ही, इथले प्राणी जरी वनचर असले तरीही ते दुसर्यांना त्रास द्यायला फार काही उतावळे नसतात.
पुढे गेलो तर कान्हेरी गुफांचे दर्शन घेतले. ही कान्हेरी गुफा म्हणजे तब्बल एकशे नऊ गुफांचा संच आहे. जवळपास पहिल्या शतकपासून ह्याची नोंद आहे. ही एकप्रकारे लेणी आहे. आठ्यान्नौ टक्के पर्यटकांच्या इथे येण्याचा आशय म्हणजे हे ‘वारसा स्थळ’ आहे. निसर्गाच्या पोटी जन्म घेऊन याने फक्त मुंबईची नाही, भारताची नाही तर संपूर्ण सृष्टीची ओळख एका विशिष्ट मर्यादेपर्यंत राखली आहे. असा असावा एखादा ‘वारसा’ जो स्वतः च्या कुळाचे आदर्श ठेवतो. अश्या वारसा स्थळांचे वैशिष्ट्ये, गुण, कौशली, ऐट व सर्व प्रमुख म्हणजे मान राखला पाहिजे. पर्यटकांच्या रांगा लागला पाहिजेत आणि आपल्या या देशाचे नाव ह्या सृष्टीच्या उत्कृष्ट यादीत कोरले जाईल. तिथे उपस्थित असलेल्या तज्ञांकडून बरीच माहिती लाभली. अश्या ह्या बुद्धांच्या काळातील असलेली कान्हेरी गुफा पवित्रपणे दगडांपासून उद्भवली आहे. अनेक बौद्धिक धार्मिक चित्राने त्याच बरोबर प्राचीन संस्कृत भाषा कोरली गेली आहे. हे एका पुरातत्वशास्त्रज्ञासाठी मोठ्या उत्सुकतेची बाब ठरते. कान्हेरी हे नाव कृष्णगिरीवरून (काळा डोंगर) पडले. हे राष्ट्रीय उद्यान पूर्णतः यावरच वसले आहे.
जसे मानवी शहरात शॉवर खाली राहिल्यावर ताण-तणाव कमी होतो तसाच या निसर्गाच्या मार्गावर रिमझिम सरीत भिजल्यावर मन तेजवान होतं. तज्ञांच्या माहितीप्रमाणे इथे तेराशे विटपांच्या जाती आहेत. यात विदेशी झाडांचा देखील समावेश आहे. अजून तर इथे दोन – पूर्णतः नैसर्गिक तलावे आहेत- ‘विहार’ व ‘तुळशी’. मुंबईच्या प्रदूशांनातून अगदी वगळले आहेत. यांचे जीवन खूप सुखी आहे. निसर्गाचे तेज राखण्यात यांचा खूप मोलाचा वाटा आहे.
इथल्या मातीचे वर्णन करण्या आगोदरच तुम्हाला खूप काही कळून गेले असेलच. अश्या ह्या पवित्र वातावरणात, या नैसर्गिक बुरशी मध्ये ही माती सुद्धा पवित्र होते. पण काही पर्यटक येऊन बराच कचरा करून या पवित्रतेला दूषित करून टाकतात. यांच्यावर टीका करावी तितकी कमीच आहे. आपण देशाची सेवा कोणत्या न कोणत्या प्रकारे करतच असतो. आपण देशाला आई मानतो. हे अरण्य ही आपल्या आई सारखेच आहे. हिची सेवा म्हणजे हिला सदैव सुखात ठेवावे. तिचे अब्रू वाया जातील असे कोणी का वागावे? जरी ही आपली जन्म दाती आई नसली तरी हिने आपला फार सांभाळ केला आहे. कृष्णाला जन्म दिला देवकीने पण सांभाळ केला यशोदाने. जी स्त्री या देशासाठी लढत असते, त्याचा सांभाळ करते , ती या संपूर्ण जगताची आई असते.
इथे पाऊला-पाऊलांवर अनेक स्टॉल उभारले गेले आहेत. यांचा रोजगार फार कमी आहे. पण यांची हिम्मत पहा! यांना अनेक प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका आहे. तरी या निसर्गाच्या कवेत यांच्या रोजगारला मोलाची किंमत आहे.
जवळ जवळ दिवस मावळत आला. इथून निघताना कंठ दाटून आला. निसर्गाने केव्हाच म्हटले नाही, “या पाहुण्यांनो या!” ; उलटे निसर्ग सदैव म्हणत राहतो, “या बाळांनो या!”. प्रदूषणाच्या हवेतून चार भिंतींमध्ये पुन्हा आलो. जारी माझे शरीर थकले असले तरी मन थकलेले नव्हते. तेव्हा अंगात वीज संचारल्यासारखे वाटले.
पण प्रत्येक गोष्टीमधून काही न काही तरी शिकायला मिळते हे खरे. निसर्ग फिरल्याने माहिती मिळाली, विशेष असे काही शिकलो नाही. एका गोष्टी मध्ये डोळे निवले. तिथले निसर्ग संतुलन इथल्या शहारांपेक्षा अतिशय वेगळे आहे. कोणी याला जागतं ठेवत असेल तर ते म्हणजे हे प्राणी! तिथले बजरंग व बाजीराव नावाचे वाघ व लक्ष्मी, दुर्गा, बिजाली व श्रीवल्ली नावच्या वाघिणी आहेत. वाघाच कशाला, या जंगलातील इतर प्राणीही दुपारचे बाहेर पडत नाहीत. फार दामलेले असतात. पण नशिबाने निसर्गाने यांना ‘मुके’ ठेवले आहे! आपल्याला कंठ फारच फुटल्यामुळे आपण आदेश सोडतो, मारामारीची भाषा करतो. ह्यांना पहा. काही ठिकाणी त्यांना कोंडून, तुरुंगात ठेवले जाते. पण जरा यांना इथे मोकळा सोडलं असलं नं तरीही हे ह्यांच्या मर्यादा ओलांडत नाहीत. शहरां-शहरांमध्ये दारू, सिगरेट ह्यांचा रोजगार दिलखुलास होत असतो. जरा मुबा दिली तर माणूस एक दुसर्याची हत्या करे पर्यंत ही जाऊ शकतो. या प्राण्यांचं त्यांच्या परिवारावर किती प्रेम असतं. स्वतः शिकार करून स्वतः चे व सोबत आपल्या परिवाराचे ही पोट भरतात. ही त्यांची रोजची उन्हातानातील मेहनत.
सुरूवातीला असं वाटायचं की जगाचे तोंडसुख झाले आहे, पण इथे आल्यावर सर्व शंकांचा पाढा वाचून झाला.
By Arham Sushma Sudarshan Bandekar

Green forest my love
🫶
Good good