खेळ तख्ताचा(Game Of Power)
By Satish Bhagwan Jawale
Original:
खूप सारे पर्याय असतात जगण्यासाठी...
मात्र लोक निवडतात पर्याय युद्धाचा... मरण्यासाठी!
जगण्यासाठी युद्ध हा पर्याय नव्हताच कधी,
तरीही
युगांमागून युगे पिढ्यांपिढ्या
तख्तावर बसलेले
निवडतातच पर्याय युद्धाचा
केवळच युद्धाच्या गोष्टी आवडतात म्हणून!
सामान्य जनता मात्र मरते मधे किड्यामुंग्यांसारखी.
तरीही तडफडतात ते युद्धात मरण्यासाठी...
कारण;
युद्धाचा बाजार करणाऱ्यांनी,
तथाकथित धर्माच्या गुत्तेदारांनी,
दिलेला असतो देव त्यांना
असल्याच कुठल्या पूर्वीच्या स्वार्थपरायण युद्धातून...
हकनाक मेलेत जे मूर्ख लोक युद्धात
इतिहास त्यांची कुठेच नोंद घेत नाही.
आणि ज्यांनी वाचवला जीव कसाबसा
ते बनतात ड्रॅगनच्या मुखातील ज्वाळा
पूढील अनंत पिढ्यांसाठी...
आणि मग...
लोक ती बनतात
नियतीचा घोर विनोद!!!
हा विनोद कळण्याइतपत विवेकबुद्धी
पडलेली असतो धारातीर्थी तिथेच रणांगणावर...
अश्या पद्धतीने,
युद्ध संपल्यावर जिंकलेला बसतो तख्तावर
आणि जगाला मिळतो एक राजा...!
आणि पुढच्या कित्येक पिढ्यांना
एक देव मिळालेला असतो!!!
English Translation:
There are so many options to survive...
But people choose the option of war... to die!
War was never an option for survival,
Still
Age after age, generation after generation
Rulers sitting on the thrones,
Choose the option of war
Just because everybody loves the story of wars!
The common people, however, die like worms.
But they still love to die in battle...
Cause;
The beneficiary of war,
The so-called agents of religion,
Gives peoples their god
From such previous selfish war...
The foolish people who died for no reason in war,
History does not keep any record of them anywhere.
And those who saved lives somehow,
They become fire of dragon's mouth
For many generations to come...
And then…
These People become
Destiny's awful joke!!!
But Sense to understand this joke
is lying there on the battlefield ...
In this way,
When the war is over,
The winner sits on the throne
And the world gets a king...!
And for the next several generations
A new god has been borned!!!
By Satish Bhagwan Jawale

Comments