कृष्णसखा
top of page

कृष्णसखा

By Dr Snehal Gorde




नेहमीप्रमाणे आजही ह्या झऱ्याजवळ आले आहे.जिथे आपण तासन् तास गप्पा मारल्या.त्या गप्पांना फार काही अर्थ होताच असं नाही.माझं काहीतरी इथे हरवलंय असं सारखं वाटत राहतं तेच शोधायला येते कधी कधी.पूर्वी मला या झऱ्याच्या पाण्याचा खूप आवाज यायचा.खळखळून तो वाहत असे.आता असा वाटतं की किती मूकपणे तो वाहतो आहे.एवढ्या निरव शांततेतही त्याचा फार आवाज नाही.



कदाचित हा माझा बदललेला स्वभाव असेल.या पाण्यात पाय सोडून बसले आहे.जेव्हा एखाद्या वाऱ्याच्या झोताने अंगावर पाणी येतं तेव्हा तू माझ्यावर उडवलेलं पाणी आठवतं.क्षणभर तन शहारतं.त्या पाण्यात तुझी पावलं दिसतात..धीरगंभीर.. शांत..त्यावरून वाहत जाणार पाणी मी कित्येकदा पाहिलंय.ते पाय मला फार आवडायचे.इथल्या कातळांवर हात ठेवला की ते तुझ्या स्पर्शाची ऊब देतात आणि तो शेजारचा चाफा उगाचच पूर्ण भरल्यासारखा वाटतो. इथल्या हवेत एक मंद गारवा आहे.पण तो मला कधीच जाणवला नाही..माझ्यातल्या तुझ्या अस्तित्वाची ऊब त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.इथेच तुला एकदा तू माझा कृष्ण आहेस असं म्हटलं होतं.तर केवढा हसला होता.पण आहेस तू. सतत माझी मस्करी करायचा.मी चिडेल यासाठी सगळं करायचा.नंतर समजून घ्यायचा आणि सामावूनही.जीवही लावला आणि एक दिवस अचानक सोडून ही गेला..एकदा म्हणाला होता,जे निघून जाणार आहे ते जाणारच आहे ते धरून ठेवण्याचा अट्टाहास आपण कशाला करायचा?मी असेलच याची खात्री नाही.तुझ्यासारखा मीही कुठेतरी समांतर वाहत असेल. पुढे कुठे तरी भेटूच की.! नशिबाला मान्य असेल तर एकत्र वाहू. शेवटी जाऊन मिसळायचे ते समुद्रातच. तिथे गेल्यावर तर सगळे सारखेच.जेवढे हातात येईल तेवढं घे.मात्र वाहत रहा..वाहावत जाऊ नको.मन स्थिर ठेव.आलेल्या परिस्थितीला धीराने सामोरी जा. तुझ्यात गुंतू नको असं म्हणायचा खरं,पण आजही सगळं येऊन थांबतं ते तुझ्यापाशीच..असो..

आज क्षणभर विसावण्यासाठी तुझा खांदा नाही. गुंफायला तुझे हात नाहीत.समोरच्या वाहत्या प्रवाहात तुझे पाय नाहीत.पण इथल्या प्रत्येक गोष्टीत तुझा भास होतो.शरीराने नाही पण मनाने येतच असशील तूही कधीतरी इथे.त्याशिवाय माझं मन इथे ओढ घेत नाही..

खूप उशीर झाला.आता निघायला हवं.पण जे शोधण्यासाठी इथे आले ते मात्र न शोधताच परत निघाले.. सगळं इथेच सोडून..पुन्हा इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं.नाही का! आणि त्या पाण्यासारख्या आपल्या प्रेमाच्या पावित्र्याला, साधेपणाला, निर्मळतेला आणि निरागसतेला या जगात थारा नाही रे माधवा!



By Dr Snehal Gorde




13 views0 comments

Recent Posts

See All

The Hypocritic Hue

By Khushi Roy Everything is fair in love and war, in passion and aggression. Because every lover is a warrior and every warrior a lover. Let it be, the vulnerability of a warrior or the violence of a

Stree Asmaanta

By Priyanka Gupta असमानता नहीं महिलाओं की पुरुषों पर निर्भरता वास्तविक दुर्भाग्य है महिला और पुरुष के मध्य भेद प्रकृति प्रदत्त है,लेकिन भेदभाव समाज की देन है।किसी एक लिंग को दूसरे पर वरीयता देना और लि

bottom of page