एकांत
Updated: Aug 28, 2025
By Arati Prakash Mahalle
जिथे कुणी नसूनही कुणी तरी सदैव असतो, तो म्हणजे एकांत ...
अंतर मनातील प्रत्येक विवरण सोडवणारा, सोबती म्हणजे एकांत ...
अस्पष्ट असूनही प्रत्येक गोष्ट स्पष्ट पणे समजून सांगणार, ठिकाण म्हणजे एकांत ...
स्वतःची स्वतःला नेहमी ओळख पटवून देणारा, मित्र म्हणजे एकांत ...
शब्द जरी कमी पण ; अनेक अनुभव देऊन जाणार, अबोलक वादळ म्हणजे एकांत ...
अस्थिर असूनही स्थिरता निर्माण करणारा, काळोख म्हणजे एकांत ...
एका साधारण व्यक्तीला कवियत्री बनवणार, एक मात्र साधन म्हणजे एकांत ...
जगावेगळ्या घडणाऱ्या प्रत्येक हालचालींचा, अदृश्य पुरावा म्हणजे एकांत ...
दुःखातखंबीरपणेसाथदेणारापाठीराखा, तोम्हणजेएकांत ....
By Arati Prakash Mahalle

Comments