एक सांगयच होतं
By Shivpriya Khude
एक सांगयच होतं ...
मनातच राहुन जाइन बोलायच होतं …
माझ्या वहितल शेवटच्या पानावर
लिहलेल तुझ नाव दाखवायचा होतं ...
मैत्री च्या नात्यातून कधी हा
तयार झालेला भावबंध सांगायचा होता …
कधी तुला सांगितलं नसेल
की तुझ्या हसताना येणाऱ्या खळीवर
कधीच माझा जीव आला होता सांगायचा होत …
प्रत्येक गोष्टी मध्ये तुझा तो विश्वासाने येणार हात
आयुष्यभर रहावा अस सांगयचा राहिल होतं ...
आता जे तु सगळ सोडुन जात आहे
माझ्या साठी थांबशील का विचारायच होतं …
मनाच्या या अस्ताव्यस्त भावना
शांत करायचं राहिल होतं …
एक सांगायचा होतं
तुला जाताना स्वतःला कसं सांभाळायचा
सांगायचा राहुनच गेल होतं …
पुड़े कधी भेटशिल विचारायच राहिलंच होत . . . . .
By Shivpriya Khude

Comments