आमिरी
By Prasad Gajanan Bhave
आज माझे शत्रु ही सलगी कराया लागले,
काय असते ही अमिरी आता कळाया लागले.
दिसताच मी बदलून रस्ता जात होते जे कधी,
बघताच मजला ते ही आता स्मित द्याया लागले.
दारिद्रय माझे पाहुनी सोडून गेली कोणी कधी,
आता तिचेही संधी शोधून फोन या या लागले.
खायला तु काळ आहे, भार आहे या भुईला,
ह्या कुळाचा तूच दीपक ते म्हणाया लागले.
हसण्याचा ही अभिनय आता कराया लागलो,
मनात हे अन् जनात ते,आता जमाया लागले.
माणूस अन् जनावर तो ही आता व्हाया लागले,
कोणत्या गर्तेत माझे पाय जाया लागले.
By Prasad Gajanan Bhave

Comments