Questions Need Answers!
By Shalaka Jadhav
प्रश्नांना उत्तर हवं असतं,
तर शंकांना निरसन
कोड्याला सुटणं हवं असतं,
तर विचारांना शांतता....
काही वेळेला आयुष्याचं
काही कळत नाही...
आणि मग वाटतं
हे काय आहे सगळं?
का आहे?
आणि कधी संपणार?
ह्या सगळ्याचा विचार करण्यातंच
अर्ध आयुष्य निघुन जातं...
मागे वळून पाहिलं कि
असं वाटतं,
भूतकाळ बरा होता
आणि भविष्याच्या तडजोडीत....
वर्तमान? निसटला...
काही धरलं की काही सुटतंच...
पण म्हणून आयुष्य जगणं सोडून द्यायचं का?
निरूत्तर!!!
Questions need answers,
So, doubts to be resolved
The puzzle needs to be solved,
So, thoughts need peace...
Life at some point
Doesn’t understand...
And then it feels,
What is this all about?
Why is this all?
And when will it end?
Just thinking about it all
Half a life goes by...
Looking back
It seems,
The past was satisfactory
And for future compromises....
Present? Slip away...
If you hold something,
Something will be released...
But then,
Should we give up on living?
Unanswerable!!!
By Shalaka Jadhav

Comments