May(माय )/माँ
Updated: Jul 30, 2025
By Vrushali Kulkarni
आता कधीही माहेरी गेल्यावर ती दिसणार नव्हती
तिच्या बेड वर ती आता असणार नव्हती
आलीस का गं बरे झाले, असे म्हणणार नव्हती
रहात जा गं दोन दिवस तरी, असा आग्रह करणार नव्हती
चांगली होती तेव्हा दारात भाकर तुकडा घेऊन वाट पाहत होती
डोळ्याला पाणी लावून लेकरांना घरात घेत होती
लेकरांकरता पुरणवरणाचा स्वैपाक रांधत होती
साडी चोळी देऊन लेकीची ओटी भरत होती
मेतकूट, लोणचे, पापड-पापड्या हातचे राखीत होती
छान जातात चार दिवस हसून म्हणत होती
थकून जेव्हा दुसऱ्यावर परावलंबी झाली
आईचीच माया पण हट्टात बदलली गेली
आता आईची झाली लहान लेक, अन लेक झाली माय
नको असे हट्ट करू तुला समजावू कशी अन काय?
हट्टी आईला लेक कधी रागे भरत होती
बळे बळे चार घास भरवून थोपटून निजवत होती
सासरी जाणाऱ्या लेकीचा पाय नव्हता निघत
परत आल्यावर आई तिच्या जागी दिसेल? नव्हते वाटत
झालेही तसेच, पडदा पडला काळाचा
लेकरांना हाक मारत आईने निरोप घेतला जगाचा
सगळे झाले गोळा हाका मारत आई-आई
लेकरांनो आता तुमच्याकरता माय दारात उभी नाही
.
आता माय दारात उभी नाही
माँ
अब कभी मायके जाने पर वह दिखेगी नहीं
उसके बेड पर वह होगी नहीं
अच्छा हुआ आ गई, कहेगी नहीं
चार दिन रहकर जा दोहराएगी नहीं
अच्छी थी तब बच्चों के आने का रास्ता तकती रहती
दरवाजे पर ही आँखों से आरती उतारती
बच्चों के लिए उनका पसंदीदा खाना बनाती
जाते हुए अचार-पापड से थैले भर देती
बच्चों के आने पर हसती-चहकती रहती
थककर जब परावलंबी हुई
माँ की ममता जिद में बदल गई
अब माँ हुई बच्ची, और बच्ची बन गई माँ
जिद न कर, समझाती रहती बेटी
खिला-पिलाकर, सुलाती थी
ससुराल जाते हुए पैर न निकलता बेटी का
जाने अगली बार माँ दिखेगी भी की नहीं
वैसा ही हुआ, समय का चक्र चला
बच्चों को बुलाते-बुलाते माँ ने परलोक का रास्ता सुधारा
अब तुम्हारे लिए माँ नहीं खड़ी दरवाजे पर
.
माँ नहीं खड़ी दरवाजे पर
By Vrushali Kulkarni

Comments