May Marathi (माय मराठी)
Updated: Sep 16, 2025
By Kalyani S. Digraskar
मज परी दिधले सौख्य हया दिनी,
तुची माझा श्वास, तुची माझा ध्यास...
उत्तुंग भरारी घेती तुझी लेकरे,
आस आहे परमार्थाची जोडुनी ही करे...
नमवुनी मस्तक तुजपाशी मुखी हास्य मंदाकिनी...
तुची माझी वाचा, अस्मिता ही या जिवणी...
तीर्थस्वरूप तू , तीर्थरूप तू सर्व ठायी,
थोरांचा आशीर्वाद ही माझी माय मराठी !
By Kalyani S. Digraskar

Comments