Marathi Poem - Sukh Chaaya
- Hashtag Kalakar
- May 9, 2023
- 1 min read
By Anagha Kulkarni
ओसाड रान काटेरी बाभुळ वृक्षांनी सजले
अन निवडुंगाचा सदरा लेउनी खिन्नसे हसले
वाटेवर माझ्या इकडे कोणी ही फिरकत नाही
या खोल उदासपणाच्या रंगात रंगले दिसले
रणरणती दुपार सांगे ही आग बोचरी आहे
काटेरी निवडुंगाची बघ वाट साजरी आहे
पण वा-याची दाहकता कोणाला सोडत नाही
मातीचा कण ही आता आगीवर आरुढ आहे
देठाची झाली काडी तलखीने ती ही सुकली
रानाच्या हिरव्या ओल्या ती आठवणींना मुकली
धरणीला पडल्या भेगा थोडी ही ओल न येथे
पाण्याच्या थेंबासाठी अवघी अवनी आसुसली
हे ऋतू चक्र काळाचे की फासे कालपटाचे
ग्रीष्माची लाही लाही मग मेघनाद वर्षेचे
रंगात रंगले हिरव्या ओसाड रान काटेरी
दुःखाच्यामागेसुखहेभाकीतअटळजगताचे
By Anagha Kulkarni

Comments