Khaki Vardi
By Akshay Kadam
मनात माझ्या वसते कुणी एक गोड
फक्त तिचाच विचार फक्त तिचीच ओढ
वाटते आपल्या मिठीत असावी परी ती
पण सजते त्याहुन गोष्ट एक अंगावरती
दोहींतून एकीची निवड करणे आहे भाग
स्वप्नामध्ये रमण्यापेक्षा स्वप्नपूर्तीस जाग
उठवून नजर दिमाखात मुठ्ठी आवळल्या
क्षणीक आनंदाच्या टोपल्या लाथाडल्या
वेदना त्रास कटु अनुभव झेलण्या तयार
हळवे मनाचे झाले आता कठोर अवजार
आधार घेत बहरल्या वेल्या नाजूक वेगा
रोप उमलले नशीबाचे देत खडकास भेगा
सुटत गेला विश्वास संगे अपयशाचा त्रागा
मनातली तिला मिळवण्यास निश्चयाचा धागा
तिच्या करिता काहीही हट्ट बनला दर्दी
मनात जी वसली ती आहे खाकी वर्दी
By Akshay Kadam

Comments