Karna
By Nagesh Krishna Parab
मला कर्ण बनायचं
असेल हे जग महाभारत
तर मला ही युद्ध लढायचं
तुम्ही जिंका पांडव बनून
पण मला तर कर्ण बनायचं ।।
क्षत्रिय असून ही गरिबीत वाढला
सूर्य पुत्र असून ही मरेपर्यंत सूत पुत्र राहिला
आपल्या जातीवर नाही तर कौशल्या वर जगायचंय
तुम्ही व्हा तुमच्या नावावर मोठे मला कीर्तीवंत व्हायचंय ।।
तुम्ही घ्या भगवान श्रीकृष्ण तुमच्या बाजूने
अर्जुन घ्या आणि सर्व देव ही
धर्म आणि अधर्म च्या युद्धात माझ्या वाटेला द्या अधर्म ही
पण दया एक मित्र दुर्योधना सारखा मैत्री करणारा
की ज्याच्या मैत्रीसाठी जीव देणारा मला मित्र बनायचं ।।
नको मला कवच कुंडल
नको कोणतच रक्षण
हव फक्त त्या कर्ण सारख निर्मळ मन
जिच्या मुळे आपल आयुष्य नर्क झाल
त्या मातेला ही हसत हसत माफ करायचंय।।
By Nagesh Krishna Parab

Comments