Artwork By Rashmi Bafna
- Hashtag Kalakar
- Jan 6, 2024
- 1 min read
Updated: Mar 20, 2024
Name Of The Artwork: Maharo Rahasthan, Garden of love, Find your piece, Bird of paradise, Mothers love Caption Of Artwork: संपूर्ण भारत देश हा विविधतेने नटलेला आहे भारताच्या निरनिराळ्या राज्यात वेगवेगळ्या कला आणि संस्कृतीचे दर्शन घडते. या वित्रातून दाखविलेली कलाकुसर राजस्थानी कला आणि तेथील संस्कृतीचे दर्शन घडविते. कठपुतली राजस्थानची प्राचीन लोककला आहे. संपूर्ण भारतात राजस्थानची ही लोककला प्रसिद्ध आहे. कठ म्हणजे लाकूड आणि पुतनी म्हणजे बाहुली. कठपुतलीचे खेळ हे राजस्थानात गेल्या ४००० वर्षापासून चालत आले आहेत. लहान मुलांना कठपुतलीच्या खेळाच्या माध्यमातून माहिती सांगितली जाते. तसेच कथांमधून ज्ञान दिले जाते. कठपुतली हे राजस्थानी संस्कृतीचे प्रतिक आहे. हा खेळ वेगवेगळ्या विषयांवर आधरित असतो. कठपुतलीया नाच केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर या लोककलेच्या माध्यमातून नैतिक आणि सामाजिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला जातो. याच बरोबरीने राजस्थानमध्ये प्रसिद्ध आहे जोधपूर, जयपूर मधील राजवाड्यांमधील बारीक आणि नक्षीदार कलाकुसर अशाच एका पॅलेसमधील बारीक आणि सुबक कलाकुसरीच्या पाश्र्वभूमीवर कठपुतलीची बाहुली रंगीबेरंगी कपड्याने सजवून तयार केली आहे व त्यायोगे राजस्थानची कलाकुसर व लोककला संपूर्णपणे हाताने बनवून आपल्यासमोर मांडली आहे.












Comments