राग
By Ketan Phadke
राग हा माणसाचा मोठा शत्रु असतो, तो सरळ माणसाला वेडा बनवतो, सर्वांचा माणुस दुस्वास करु लागतो, स्वतःला जगापेक्षा मोठा समजु लागतो… तसा मी स्वतःला गांधीजींचा भक्त म्हणतो, पण राग आला की शाब्दिक हिंसा करतो, आपल्या माणसांना वेड्यासारखा बोलतो, आणि कधी कधी त्यांचं मन पण दुखवतो…
राग शांत झाल्यावर विचार करत बसतो, आणि वाटतं मी कधी कधी असा का वागतो, आता ह्यातून मला एकच उपाय दिसतो, मेंदुचा सल्ला हृदयापेक्षा बराच मोठा असतो… आज पासुन माझे तत्व ठरवणार माझी दिशा, कधी होऊन नाही देणार आता माझा हशा, सर्व परिस्थितीमध्ये राहीन मी स्थितप्रज्ञ, हाच असेल माझ्या जीवनभराचा यज्ञ…
By Ketan Phadke

Comments