आई
By Ketan Phadke
आईचं प्रेम शब्दात काही व्यक्त होत नाही, आणि आईचे ऋण काही एका दिनात फिटत नाही.... आई शिवाय घरातलं पान पण हालत नाही, आणि तिच्या शिवाय घरात काडी सुदधा सापडत नाही, आई घरी नसता घराला घरपणचं येत नाही, आणि आईचे ऋण काही एका दिनात फिटत नाही.... कुठेही गेलं तरी आई शिवाय काही चालत नाही, आजारी पडलं की कोणी आई शिवाय बरं होत नाही, डॉक्टरांच्या औषधाला पण आईच्या हातचा गुण येत नाही, आणि आईचे ऋण काही एका दिनात फिटत नाही....
आईच्या हातच्या चवीची सर कशालाच येत नाही, कितीही खाल्लं तरी कोणाचं समाधान होत नाही, दुसऱ्या कोणाला मास्टर शेफ म्हणायला मन धजतचं नाही, आणि आईचे ऋण काही एका दिनात फिटत नाही.... कितीही मोठं झालं तरी कोणी आईपेक्षा मोठं होत नाही, आईच्या आशीर्वादाची शक्ती मंदिरात सुद्धा मिळत नाही, आईचा हात पाठीवर असता जगाची फिकीरच वाटत नाही, आणि आईचे ऋण काही एका दिनात फिटत नाही.... प्रत्येक यशाला आई खेरीज कोणाला श्रेय नाही, आईच्या आनंदाला कारण बनण्यासारखं काही ध्येय नाही, आईच्या आनंदाश्रू शिवाय जिंकल्या सारखंचं वाटत नाही, आणि आईचे ऋण काही एका दिनात फिटत नाही....
By Ketan Phadke

Comments