"तुमच्या समोर अडाणीच आम्ही..!!"
top of page

"तुमच्या समोर अडाणीच आम्ही..!!"

By AMEY KSHIRSAGAR



साधारण वेगवेगळ्या प्रसंगी अन वेगवेगळ्या टोन मध्ये हे लहानपणा पासून आई बाबा आजी आजोबा यांच्याकडून ऐकत आलोय.. आणि अजून आपण हे म्हणायला चिकार वेळ आहे असं वाटत होतं तेवढ्यात काल किस्सा झालाच...!!!




काल नेहमीप्रमाणे पौर्णिमेला नृसिंहवाडीला दर्शनाला जायचं ठरलं.. फरक एवढाच की दादा आल्याने घरातल्यांसोबत.. सोबत बडबडखाना "सारा" होतीच.. जाताना आपण कुठे चाललोय या प्रश्नाला दत्तगुरूंचं देऊळ आहे तिथे चाललोय असं सांगितल्यावर "म्हणजे ज्युपिटर चा बाप्पा का?" हा अत्यंत अनपेक्षित प्रश्न आला आणि अनावधानाने माझा गाडीवरचा ताबाच सुटला क्षणभर..!! मी परत गाडीवर आणि पर्यायाने माझ्यावर ताबा मिळवतोय तेवढ्यात या कार्टीला "नॉर्थस्टार" दिसल्यासारखं वाटलं..(आपल्या भाषेतला ध्रुव तारा..जो अजूनही मला नीट ओळखता येत नाही..!) च्यायला कॉन्फिडन्सची एशितैशी ते पण 4वर्षाच्या पुतणी कडून..!!

जाताना "झिंदा... है तो.. प्याला... पुरा भरदे" (भाग मिल्खा भाग) म्हणणारी ही जुपिटरच्या बाप्पासमोर "निःशंक हो निर्भय हो मना रे" म्हणते.. आणि गाडीत येताना "रामरक्षा" नंतर बडबडगीते..यातलं एकही मला पूर्ण आणि अस्खलित म्हणता येत नाही हे बघून "काका तुला येत नसेल तर माझ्यामागून म्हण असं सांगूनही झालं.."

आता पुढची पिढी बघून हे पटतंय ...."तुमच्या समोर अडाणीच आम्ही..!!"



By AMEY KSHIRSAGAR




3 views0 comments

Recent Posts

See All

He Said, He Said

By Vishnu J Inspector Raghav Soliah paced briskly around the room, the subtle aroma of his Marlboro trailing behind him. The police station was buzzing with activity, with his colleagues running aroun

Jurm Aur Jurmana

By Chirag उस्मान-लंगड़े ने बिल्डिंग के बेसमेंट में गाडी पार्क की ही थी कि अचानक किसी के कराहने ने की एक आवाज़ आईI आवाज़ सुनते ही उस्मान-लंगड़े का गुनगुनाना ऐसे बंध हो गया मानो किसी ने रिमोट-कंट्रोल पर म्य

bottom of page