कविता केल्याने काय होतं?
top of page

कविता केल्याने काय होतं?

By Hrushikesh Takalkar


कविता केल्याने काय होतं?

प्रेमात पडलाय की काय.. असं वाटतं?

का प्रेमभंग झालाय असं दिसतं?


कविता केल्याने काय होतं?

मन आपलं कागदावर उतरतं?

का कागदांवरच्या शब्दात अर्थ शोधतं?


कविता केल्याने काय होतं?

घडलं ते सगळं बाहेर पडतं?

का झालं ते सगळं परत आठवतं?


कविता केल्याने काय होतं?

शिवलं जातं काळीज उसवलेलं?

का जोडलं जातं नातं तुटलेलं?





कविता केल्याने काय होतं?

होत्याचं नव्हतं होतं?

का नव्हतच कधी ते होत्यात बदलतं?


कविता केल्याने काय होतं?

Sorry म्हणणं सोपं जातं?

का माफ करायला अवघड जातं?


कविता केल्याने काय होतं?

घडून गेलेलं सारं मनांत चिंब भिजतं?

का नव्या उमेदीने नात्याला मजबूत बनवतं?



जर ह्यातले काहीच नाही घडत तर…

सोडूनद्यावंकविताकरणं.. हेचखरं.


By Hrushikesh Takalkar




4 views0 comments

Recent Posts

See All

Maa

By Hemant Kumar बेशक ! वो मेरी ही खातिर टकराती है ज़माने से , सौ ताने सुनती है मैं लाख छुपाऊं , वो चहरे से मेरे सारे दर्द पढती है जब भी उठाती है हाथ दुआओं में , वो माँ मेरी तकदीर को बुनती है, भुला कर 

Love

By Hemant Kumar जब जब इस मोड़ मुडा हूं मैं हर दफा मोहब्बत में टूट कर के जुड़ा हूं मैं शिक़ायत नहीं है जिसने तोड़ा मुझको टुकड़े-टुकड़े किया है शिक़ायत यही है हर टुकड़े में समाया , वो मेरा पिया है सितमग

Pain

By Ankita Sah How's pain? Someone asked me again. " Pain.." I wondered, Being thoughtless for a while... Is actually full of thoughts. An ocean so deep, you do not know if you will resurface. You keep

bottom of page