Shirt
top of page

Shirt

By Hrushikesh Takalkar


एका नाजूकश्या धाग्याने

त्या डोळ्यामधे प्रवेश केला

बघतां बघतां गुंतागुंतीत

मी नकळत जन्म घेतला


कधी भिजलो रंगात

कधी चमकलो उन्हात

पण कधी धडपडलो तर

Surf वगैरे पकडून धुतात


काय सांगू पाठ मोडते

Collar सुद्धा खाली बसते

दांडीवर दमून अंग टाकावे तर

“Dull” होण्याचे टेन्शन येते


मग येते तीऽस्त्री

तिची काही खात्री नाही

“Hotness” तिचा अनुभवल्यावर

कररर कन वळते माझी बोबडी





”डोके” तुझे कितीही असले

तरी “हात” मलाच द्यावा लागतो

भावनांचे शिंतोडे उडाले जरी

माझाच खांदा अश्रू झेलतो


“तो” कधीही उचकला की

बाही माझी दुमडतोस

अन् “त्याचा” शर्ट माखला की

Collar माझी उभारतोस


एवढे सगळे सोसल्यानंतर

बोळा माझा कोंबतोस

“तिने” मात्र बोलावले तर

माझ्याच सुरकुत्यांवर,

नाक मुरडतोस?


भक्क प्रकाशातले ते भामटे

नेहमी माझ्यासमोर मिरवतात

“Sale” चे साले लाल ठिपके

मला माझे भविष्य सांगतात


Perfume चे किती गंध मिरवले

रूप तुझे देखणे तिला दाखवले

ह्या सगळ्याची परतफेड म्हणून

शेवटी…

तूमलापुसायचेफडकेबनवले


By Hrushikesh Takalkar




3 views0 comments

Recent Posts

See All

Maa

By Hemant Kumar बेशक ! वो मेरी ही खातिर टकराती है ज़माने से , सौ ताने सुनती है मैं लाख छुपाऊं , वो चहरे से मेरे सारे दर्द पढती है जब भी उठाती है हाथ दुआओं में , वो माँ मेरी तकदीर को बुनती है, भुला कर 

Love

By Hemant Kumar जब जब इस मोड़ मुडा हूं मैं हर दफा मोहब्बत में टूट कर के जुड़ा हूं मैं शिक़ायत नहीं है जिसने तोड़ा मुझको टुकड़े-टुकड़े किया है शिक़ायत यही है हर टुकड़े में समाया , वो मेरा पिया है सितमग

Pain

By Ankita Sah How's pain? Someone asked me again. " Pain.." I wondered, Being thoughtless for a while... Is actually full of thoughts. An ocean so deep, you do not know if you will resurface. You keep

bottom of page