- hashtagkalakar
आई
By Arati Prakash Mahalle
ओठा वरील सुरकुत्या नेहमी जिच्या उबदार कुशीत हळुवार विरघळतात ....
सोबत तिच्या दोन पावलांचा सहवास, देखिल देव दर्शनाचा वारसा देऊन जातात ...
जग जरी स्पर्धक झालं तरी, तिच्या नजरेत मी कायम विजेता चं राहणार ...
लाख किमया हिनवली स्वर्गची जिच्यासाठी, तो स्वर्गही तिच्याच सानिध्यात भेटणार ...
जीव ओवाळून जी नेहमी दृष्ट काढते, आज तिलाच काळा टिळा लावावासा वाटला ...
नकळत प्रत्येक वेळी तिच्या डोळ्यांत माझ्यासाठी, भावनांचा उसळता झरा पाहायला भेटला ...
By Arati Prakash Mahalle