- hashtagkalakar
लेक
By Dr. Snehal Basavraj Kevate
आज तो येणार , आज तो येणार ,
घरात नुसती सगळ्यांची पळापळ ,
आज आमच्या पिल्लूला बघायला
मुलगा येणार ,मुलगा छान आहे ,
सुशिक्षित आहे ,सगळ्यांची एकच वाक्य ,
पण बाबा शांत ,बघता बघता माझं पिल्लु
इतकं मोठं कधी झालं ,कळलच नाही,
कधी तिने आमच्या मनात , घर केलं कळलच नाही ,
कालपर्यंत बाबा म्हणणारी ,
आईशिवाय काम न करणारी , माझी पोर ,
दुसऱ्याच्या घरी जाणार , दुसऱ्याची होणार,
या विचाराने बाबांचे डोळे पाणावलेले
अश्रू डोळ्यात आलेले ,
पण आपल्या पोरिसाठी दाबून ठेवलेले,
दुःख खूप असले तरी लपवून ठेवले
आपल्याच मुलीसाठी ,तिच्या सुखासाठी !!
Daughter
Today he will come , he will come today .
my daughter became elder ,
How she bonded every member in home .
Till yesterday she told Papa ,Papa
Can't live without mother ,
Now she will going another home ,
because of thinking about daughter
father became sad but he hiding his tears
for her daughter.
Having lot of sadness but for
happiness of her daughter.
He is hiding his emotions .
By Dr. Snehal Basavraj Kevate