- hashtagkalakar
चूक
By Dr.Snehal Basavraj kevate
कमी तुझ्या प्रेमात ही नाही ,
तुझ्यात ही नाही ,
चूक तुझी नव्हतीच तेव्हाही
चूक तुझी आता ही नाही .
समजून घेणे तुला जमले नाही
समजावता मलाही आले नाही ,
रागात बोलयचास तू ,
रागात तूला शांत करणे मला जमले नाही,
हक्काने ओरडायचा स माझ्यावर ,
माझ्यावर नाही तर कोणावर ओरडणार हे
मला कधी कळलेच नाही ,
प्रत्येक गोष्टीत मी चुकत गेले ,
तू कधीच चूक दाखवली नाहीस ,
लक्षात आली चूक तेव्हा तू खूप दूर होतास
चुकीसाठी माफी मागायला पण नव्हतास !!
Mistake
No deficiency in your love ,
no deficiency in you .
Not your mistake at that time ,
not your mistake now .
You can't understand me ,
also I didn't try to understand you.
I talked in anger ,
I didn't try to calm you .
You scolded me , that was your right ,
but I didn't understand this.
My mistake in many things but didn't shown me.
When I realise my mistake
you were so far from me .
you didn't present to accept my sorry .
By Dr.Snehal Basavraj kevate