नाते
- Hashtag Kalakar
- Dec 13, 2025
- 1 min read
By Mohini C. Halarnkar
सखी म्हणू की माऊली
नाही समजत काही
ताई म्हणू की आई,
हेही समजत नाही l
नाते तुझे लाघवी,
हृदयास हाक देई l
काय म्हणू या नात्या ?
हृदयच अवाक होई l
शब्दांवरची प्रीत तुझी ग
लावी वेड मनाला l
सूप्त दडलेले मनात तुझिया
साद घाली हृदयाला l
ह्या जन्माचे की त्या जन्माचे
नाही ठावे मजला l
परी नाते आहे अतूट एक,
मन सांगे परत परत हृदयाला l
By Mohini C. Halarnkar

Comments