- hashtagkalakar
चाफा
By Shubhangi Ashish Deoorkar
वाळल्या फुलांनाही गंध प्रेमाचा येतो
दाटला अंधार कितीही तरी सूर्य रोज नव्याने येतो;
बघ कोपऱ्यावरचा चाफा परत बहरलेला
तुझ्या माझ्या भेटीसाठी किती आसुसलेला ;
तू माझ्या मनाच्या गाभाऱ्यात वसलेलं पूर्ण गाव आहे
तुझ्याशिवाय जगण्यालाही काय अर्थ आहे;
तुझ्या माझ्या प्रेमाचा साक्षीदार तो बाप्पा आहे
मग या समाजाला तू का घाबरत आहे;
असू दे आयुष्यात संकटे कितीही
जर सोबतीला बाप्पा नी तू आहे .
By Shubhangi Ashish Deoorkar