- hashtagkalakar
गुरू
Updated: Dec 6, 2022
By Sayali Sudhakar Shinde
कुणी दोरा घेई कुणी विचार,
कुणी विचारांचे सुविचार.
कुणी वारसा घेऊनी हृदयाशी सकल,
कुणी वारकरी होऊनी पुंडलिका चा विठ्ठल.
कुणी ज्ञानी ते श्रेष्ठ, कुणी रामाचे वसिष्ठ.
कुणा दारी वृंदावन, कुणी कृष्णाचे संदीपन.
कुणी कर कटेवरी ठेऊनी निवृत्तीचा ज्ञानी..
कुणी जीवाशी ओवाळूनी, अभंग तुका वाणी.
कुणी अर्जुनाचे चातुर्य, कुणी भीमाचे जाणुनी शौर्य.
कुणी कपटी दुर्योधनी, कुणी अजाण एकलव्य.
ज्ञानी, मनी, ध्यानी एकची एक ध्यास,
कुणी द्रोणाचार्य होऊनी, कुणी होऊनी गुरु व्यास||
By Sayali Sudhakar Shinde