- hashtagkalakar
उचकी
By Prasad Gajanan Bhave
मी तुझा अन् तू दुजाची का असे हे सांग ना?
का असा कल्लोळ होतो भावनांचा सांग ना?
आसवांच्या ह्या उशीची भेट का मज सांग ना?
का असा वर्षाव होतो आठवांचा सांग ना?
कालची आतुर तू , मज टाळते का सांग ना?
का असा अतिरेक होतो यातानांचा सांग ना?
स्पर्श होता तो तुझा अन हा शहारा आज का?
काय रंध्रातून घेते तू निवारा सांग ना?
श्वास हा आहे तुझा की भास माझा सांग ना?
रोज उचकी हाय तुजला लागते का सांग ना?
By Prasad Gajanan Bhave