By Rupam Ramesh Dange
हळूच माझ्या नजरेने तिच्याकडे पाहिलं,
हळूच तिने मला पाहून स्वतःला विसरलं,
स्वतःला विसरताना तिने जरा स्मित हास्य केलं,
स्मित हास्य करतांना तिने जरा मान खाली घेतली,
मान खाली घेताना तिने जरा दातांनी बोट चावलं,
तोच तिची पाऊले माझ्याकडे हळूहळू वळु लागली,
माझ्या समोर येताच तिचे पाऊल विसावले,
हळूच तिने कानात माझ्या शब्द फुंकरले,
सारा थकवा विसरुनी मी मज विसरलो…
By Rupam Ramesh Dange
Comments