वेगळ्या
- Hashtag Kalakar
- Dec 13, 2025
- 1 min read
By Mohini C. Halarnkar
श्री स्वामी समर्थ जय जय
स्वामी समर्थ,
तुम्हीच माझ्या जगण्या दिधला
एक नवा अर्थ l
प्रत्येक दिनी माझ्या असते
एक नवे युद्ध l
तुम्हीच स्वामी करता मजला
प्रतिदिनी शुद्ध l
तुम्हीच होता आई माझी
ऐकून घेता सगळे l
म्हणूनच मन मग होते माझे
मोकळे मोकळे l
तुम्हीच घेऊन जाता माझ्या
चींता त्या सगळ्या l
हळूच कानी येऊन सांगता
काय ग बाई तुझ्या सगळ्या चिंता
वेगळ्या l
By Mohini C. Halarnkar

Comments