वेगळी नाती
- Hashtag Kalakar
- Dec 13, 2025
- 1 min read
By Mohini C. Halarnkar
सप्तपदी मी चालून आले
तुझ्या संसारी
माझे माझे सगळे ठेवून
आले माहेरी l
नव्या दुनियेतले नवे श्वास ते
घेतले तुझ्या संगे
तुझ्या साथीने जोडले सारे
नवे नवे धागे l
कुणी होती सासू माझी
कुणी ती नणंद l
कुणी होती जाऊ बाई
परी कुणी न झाली आई l
तूच होता सर्वस्व माझा
सखा अन सोबती l
तुझ्याचसाठी जपली सारी
वेगवेगळी. नाती l
स्त्रीत्वाचे आगळे नाते
जपले तुझ्याच संगे l
तू माझाच अन् मी तुझीच रे
रंगलो याच रंगे l
By Mohini C. Halarnkar

Comments