By Kaustubh Rajendra Dherge
मैत्रीला न हवे बोल न कोणती भाषा ।
मैत्रीच पल्लवित करते नात्यांतील अनेक आशा ।।
रक्ताचे नसूनही आपलेसे वाटावे असे नाते |
मैत्रीच्या याच नात्यात संपूर्ण जग सामावून जाते ।।
मैत्रीच्या नात्याला नसते कोणतेही बंधन ना कोणत्या सीमा ।
आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर होतो इथे आठवणींचे व्याज ठेवींमध्ये जमा ।।
भांडणातही मैत्री आहे विश्वासाचा अभेद्य किल्ला ।
संकटाच्या काळात जवळचा वाटतो मित्रांचा निःस्वार्थी सल्ला ।।
जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी मिळणारा मोकळा श्वास आहे मैत्री ।
संपूर्ण विश्वासाला भुलवावे असा आभास आहे मैत्री ।।
By Kaustubh Rajendra Dherge
Very nice work. Excellent keep it up.