By Amol Kharat
रावकळा त्यो पावसाचा अन त्यात शब्दांचा ....
लळा त्यो मातीचा अन कोरड्या प्रीतीचा ........
गोळा करावं का भिजावं या परिस्थितीचा ........
जाऊदे.......पडू दे...पडू पडू मुरू दे ..........
बघतो आता नाच या वाकडया तिकड्या अंगणात थेंबांचा ....
लाख लाख रिंगणं थेंबांचे ... थेंबभरच क्षणांचे ......
धाक गळक्या घरांचे ..... इथं अडकून गळक्यातच अडकलेल्या मनांचे ....
मी मोकाट वारा .....मुरून ह्या रावकळ्यात ...
अडकलेल्यांसोबत उभा कोरड्यात ..... भिजून गेलेल्या मनमळ्यात ......
By Amol Kharat
Commentaires