By Kaustubh Rajendra Dherge
कालच्या त्या वाटेवर अपयश आले आहे,
तरीही उद्याच्या नवीन वाटेचे स्वागत कर,
तु आता पुढे चाल ||
येतील रस्त्यात अनेक अडचणी ।
त्या सर्व मागे सारून, तु आता पुढे चाल ॥
सांत्वनसदेखील येतील लोकं,
त्यांच्या अनुभवातून पाठ घेऊन, तु आता पुढे चाल ॥
ध्येयाच्या उंच आकाशात गरुडासारखी झेप घेण्या
तुझ्या पंखांना तू बळकट कर, तु आता पुढे चाल ॥
हुकलेल्या संधीचे ओझे ह्रदयातून काढून टाकून,
पुन्हा नव्याने सुरुवात कर, तु आता पुढे चाल ॥
मनातील कलुषित नकारात्मकता मागे सारून,
सकारात्मकता अंगीकारण्याचा प्रयत्न कर,
मित्रा तु आता पुढे चाल ॥
By Kaustubh Rajendra Dherge
Chhan
Apratim👌
आप
सुंदर!!!💗🧿
Great