तिचे लडावलेले शेंडेफळ
- Hashtag Kalakar
- Dec 13, 2025
- 1 min read
By Rucha Joshi
मायेचे ओसर, मायेची मंडळी,
मायेची गो लेक तुझी,
न थकता बोलणे, विवाद हा कसला,
तुझ्याच पोटी जन्म आम्ही हा घेतला.
तुझेच हाड-मास तरी, फरक हा कसला?
तो लहान, तर्क हा कसला?
ज्येष्ठ म्हणून जबाबदाऱ्यांनी दबली ही ओंजळ,
न कधी कष्ट न आदर कोणासाठी असे हे त्याचे जीवन.
उठल्या-बसल्या काहीतरी करून दाखविण्याची आस,
इच्छा मारता-मारता प्रयत्न हेच एकमात्र ध्यास,
या कष्टास कारण एकच, की खुलेल कधीतरी त्या ओठावरील कळी
अन जाणवेल शाब्बाशीची थपथपी पाठीवरी.
न अभ्यासाकडे कल, न कुठल्या कलेचे एकटकी अध्ययन,
न भावार्थ समजतो, न समझे त्यास नाती,
काय हशील? फक्त शेंडेफळ म्हणून मिरविती.
राग मानवा कोणाचा, आसवे गाळावी कोणासाठी,
शब्द शस्त्र, घातक शस्त्र भेदुनी हृदयास लागे जिव्हारी.
लेकरे दोन तुझीच ना आम्ही?
मग त्याच्या वाटी पदर मायेचा, परंतु माझ्या मस्तकी संस्कारांचा थप्पा.
बंधन नसूनही बंधन आढळते स्वतः स्वतःवरील,
खरे काय खोटे काय, चूक काय बरोबर काय,
चार वेळा पूर्वविचार हा देही अटल होई.
हेवा ह्याचाच वाटे मझ,
की आई, बाई, सखी अन शिक्षिका सर्वच काही झालीस तू त्याची
पण राहिलीस फक्त आईच तू माझी.
By Rucha Joshi

One of my favourites!
Truly a meaningful poem
Lots of angst in this one and the words cut very sharp and raw.
A deeply moving, well written and socially resonant poem that captures the quiet pain of emotional inequality within motherhood.
Its honest voice, sharp observations, and restrained intensity make it both heartbreaking and powerful, lingering long after the final line.