By Amol Kharat
मी झाडांकडं बघत होतो गं , जवळच एक झाडाचं पिल्लू होत . फार गोंडस , एवढु-एवढुशे पानं होते त्या पिल्लाचे ....
मी गोंजारलं त्या पानांना ... मग न्याहाळत बसलो त्याच्या सारख्याच सगळ्या आजूबाजूच्या पिल्लाना . प्रत्येक पिल्लू वेगवेगळ्या घरातील होत .... प्रत्येकाचं रूप आणि आकार वेग-वेगळचं ... तरीही सगळेच हिरवे. त्या मोकाळलेल्या अवकाशातून मोकळ्याच आकाशाकडं बघत , जणू आकाशातल्या सुर्याचा प्रकाश, दूध म्हणून पीत ...आणि मातीही सांभाळत होती त्यांना पाण्याचे हात धरून ....
सूर्याला पिणारी ही पिल्लं ... माती-पाण्याच्या च्या कुशीत राहूनच त्या अवकाशाचं एकटेपण घालवण्यासाठी, वाऱ्याला आवार घालायला निघालेत खूप ....संथ गतीने. ती गती दिसू शकली नाही मला.( बहुतेक माझ्या बघण्याच्या गतीचा वेग माझ्या दूधाच्या प्रकारावर अवलंबून असावा ) वाराही कसा त्याचा वेग कमी करील ....? त्यासाठी या पिलांना मोठं व्हावं लागेल खूप ... खूप मोठं ... तो प्रयन्त पिलेपण जगलेले त्यांचे वडीलधारे आहेतच कंबर कसून , वाऱ्याला अडवत आणि ऑक्सिजन घडवत . खरंतर वाराही प्रेमळच पण खेळकर आहे, तो या पिलांना काय दिसणार ? स्वतःला दिसू देत नाही ना तो ....तसंच तो या एकट्या पडलेल्या अवकाशाला कवटाळत फिरत असतो हेही तो दिसू देत नाही .
पण या पिलांच्या वडिलधाऱ्यांनी आता आडवलाय त्याला …..आणि अश्यात आभाळही कसं माघ राहील ? तेही आलाय आफटपणाचे घास थेंबा- थेंबानं पिलांना भरवायला …. भक्कमता यांच्या पायी रुजवायला …...बघ ना... वाढतील आता हे पिलंही ..त्यांच्या सारखेच पिलंपणाचं बीज जनवायला ..अन तायांसाठी मग वाऱ्याला अडवायला …..आता शांत झालेत त्यांच्या वडिलधाऱ्यांचे सारे पानं ….स्थिरत्वाचं भव्यपण एका सुंदर लयीत अलवार ..डुलवताना ….ओलेपणा त्या उरलेल्या थेंबांसकट उरावर सजवून ….संभोग आभाळाशी ….. आभाळाचा गर्भ जणू भार शून्यता जनवत आहेत …..हिरवी भार शून्यता ….रंग नसलेल्या जमिनीवर ….जमिनीतून ...जमिनीनेच जणू उभी केली आहे . आणि आता जमिनीवर पाण्याच स्वाधीन होणं दिसू लागलंय …. बघूया …….. पिलांचा आकार वाढलाय…. स्वतःचा स्वभाव त्यांनी सोडलाय.. कारण त्यांचे वडीलधारे दिसेनासे झालेत आता त्यांना…. वाऱ्याशी गप्पा मारायचं शिकलेत ते आता…. खूप बडबड करतात…. वाऱ्याला नेहमीच अडवून धरतात…. वाराही जगून घेतो... वाढलेल्या पिलांना कंबर कसून देतो... पिल्लांना आता थेट सूर्य दिसू लागलाय... अन त्यांच्या मुळ्यांना पाणी जाणवू लागलय…. वडीलधाऱ्यांचा पदराआड पिण सोप होतं... पण आता पदर लहान झालाय…. अन् प्यायचं ही आहे... पण थेट पीणं जमेना त्यांना…. मातीची कुशी संपून आता खडकात थेट पाण्याचा स्पर्श नवीनच आहे…. त्यांना हे समजून घ्यावे लागणारे ... पण, पिलेपण सोडवतही नाहीये…. मातीची कुशी...झाडाचा पदर ..थेट दूध ….थेट पाणी... यातच ते अडकलेत .पण त्यांचा सुटलेलं सूर्याला पिणं आता खुणावत आहे, तुमचं अन्न तुम्हालाच बनवायचयं….मातीचं संपणं सांगतय..आता हेच खडक फोडत सुटसुटीत मुळ्या पसरवयाच्यात...मला ही धरून ठेवायचय….आणि आता मलाही सांभाळायचय….पण वाढणाऱ्या पिलांना या खुणा कळत नाहीये…. हे नवीनच आहे सगळं... पण शिकत आहेत ते... होतील तेही वडीलधाऱ्यांसारखेच भव्य.. त्यांना काय माहित यांचे वडीलधारी ही या सगळ्यावर मात करत वाढत होते.. पण वेळ शिकवेल सगळे त्यांना... स्वतःची पिले जणवू पर्यंत पिलंपण जगू बघणारे ही वाढलेली पिलं गोड आहेत आणि गोडच देत राहतील.
By Amol Kharat
Comentários