एक कविता सरत्या वर्षाची
- Hashtag Kalakar
- Jan 11
- 1 min read
Updated: Jul 15
By Vrushali Ganesh Soman
अजून एक वर्ष सरले,
काही प्रिय , काही अप्रिय घटनांचे!
अजून एक वर्ष सरले,
भावनांच्या उतार चढावांचे!
अजून एक वर्ष सरले,
नव्या मैत्र आणि जुन्या स्नेहबंधाचे
अजून एक वर्ष सरले,
जुनी मरगळ झटकण्याचे, आणि नवीन उत्साह भरून घेण्याचे!
अजून एक वर्ष सरले,
काही दुवे सोडून जाण्याचे आणि काही नव उन्मादाचे !
अजून एक वर्ष सरले,
जुन्या झालेल्या संकल्पांचे आणि नवीन विचारांचे!
जुने दुवे दूर जातात, आठवांचे घन सोडून जातात
नवी पालवी जणू फुटत जाते, दाटणाऱ्या घनाला सावरत जाते...
वर्ष सरते, वय वाढते, नात्यांची वीण घट्ट करत जाते...
आयुष्याच्या जमाखर्चात विविध पैलू देऊन जाते...
दृढ करावे बंध जुने, नव्या बंधांनी जोडावी मने ....
किल्मिष काढून पुढे चालावे, उत्तम ते घ्यावे आणि बाकी सारे सोडून द्यावे....
बस.....एवढेच संकल्प नवीन वर्षाचे करावे...
By Vrushali Ganesh Soman

Comments