एकांत
- hashtagkalakar
- Jul 26, 2023
- 1 min read
By Kaustubh Rajendra Dherge
शब्द ना सुचे जेव्हा ना भावना व्यक्त होईल,
तो क्षण म्हणजे “एकांत”
स्वतःच स्वतःशी साधलेला संवाद म्हणजे “एकांत”
जगाला विसरून शांत झालेल्या मनाला समजून घेणे म्हणजे “एकांत”
भूतकाळात घडलेल्या चुकांची जाणीव करून देतो हा “एकांत”
भविष्याचा विचार करायला लावणारा वर्तमानातील क्षण आहे हा “एकांत”
प्रत्येक वेळी स्वतःची नवीन ओळख करून देतो हा “एकांत”
न बोलताही खूप काही शिकवून जातो हा “एकांत”
मनुष्याच्या सुखदुःखांचा कायमस्वरूपी सोबती आहे हा “एकांत”
By Kaustubh Rajendra Dherge