By Amol Kharat
आपलीच धुंद जरा मंद करून बघ ……….दिसेल फक्त वेग….धावणाऱ्यांची वाकडी-तिकडी रेघ.
या वेगाकडं बघत चल ….
सगळे प्रश्न्न उलट्या दिशेला धावताना दिसतील ….
बघत चल…………चालत रहा…………
सगळे दृश्य सजलेले दिसू लागतील….
सौंदर्य भाव गवसू लागतील………….
वेचत चल………………
सगळे ध्वनि एकसंध श्राव्य होताना दिसतील…….
सगळी मंदता एक काव्य उत्सव जनवू लागतील…….
मंद धून…नुसती गुन गुन….मंद ताल…मंद वेग…..
लयदार रेघ…..अंतरीचे मेघ… बरसू लागतील….
सगळ्या गोष्टी उत्तरांसारख्या दिसू लागतील…..
पण तू चल…. चालत रहा….
दिसेल फक्त वेग…. धावणाऱ्यांची वाकडी -तिकडी रेघ.
By Amol Kharat
コメント