अंधारलेली वाट
- hashtagkalakar
- Dec 24, 2023
- 1 min read
By Aishwarya Deo
हळु हळु श्वासातला
बहर कोमेजून गेला
जाताना स्पंदनांची
लहर सोबत घेऊन गेला
डोळ्यांजवळच्या सुरकुत्याही
स्पष्ट आता बघत होत्या
हळू हळू अंधारलेल्या
वाटेकडे जात होत्या.
चपळ हृदयाची धडकन
शांत होऊ पाहत होती
कोनाड्यातील खुर्चीवरून
शेवटच्या क्षणाकडे जात होती
बघता बघता अखेरचा
तो क्षण जवळ आला
अंधारलेल्या वाटेकडे घेऊनजाण्या
काळ स्वतः घ्यायला आला
By Aishwarya Deo